“बहाउल्लाह यांची एक शिकवण असे सांगते की, ‘मानवजातीच्या प्रगतीसाठी भौतिक संस्कृती आवश्यक असली तरी, जोपर्यंत ती दैवी संस्कृतीशी सुसंघटीत होत नाही, तोपर्यंत इच्छित परिणाम, मानवजातीचे परमोच्च सुख, प्राप्त होऊ शकत नाही’.”
— अब्दुल-बहा
बहाउल्लाह यांच्या नव्या जगाच्या दृष्टिकोनामुळे प्रभावित झालेले साऱ्या जगातले बहाई अनुयायी विविध कार्यात मग्न आहेत, ज्यातून त्यांना भौतिक व आध्यात्मिक समृध्दी असलेला जोमदार समाज निर्माण करायचा आहे. अशा समाजाच्या उदयासाठी व्यक्ती, संस्था, व सामाजिक समुहांना क्षमता आणि परिपक्वता यात प्रचंड वाढ करावी लागेल. आज भारतातील बहाई समुदायात ही क्षमता वाढविण्यासाठी उपासना आणि सेवा यावर आधारित कार्यक्रमांवर भर दिला जात आहे.
बहाई शिकवणीतील बहुमोल विचार इतरांपर्यंत पोचवणे, सामूहिक प्रार्थनेसाठी वातावरण निर्माण करणे, युवकांचे सशक्तीकरण जोपासणे, ईश्वरीय संदेशांचा अभ्यास करून ते जनकल्याणासाठी वापरण्यास मित्रांच्या गटांना सहाय्य करणे अशा माध्यमातून या कार्यक्रमातील सहभागी समाजबांधणीच्या कामाला हातभार लावतात. या कार्यक्रमात उपासना आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न यावर भर दिला जातो.