“परमेश्वराची श्रद्धा व त्याचा धर्म सचेतन करण्याचा मूळ हेतु आहे, मानव-वंशाचे हितसंबंध व ऐक्य सुरक्षित करणे आणि मानवांमध्ये प्रेम व सख्यत्वाची भावना जोपासणे.”
— बहाउल्लाह
संपूर्ण जगभरात, शहरात, नगरात आणि गावांत लाखो बहाई, आध्यात्मिक तसेच भौतिक दृष्ट्या समृध्द समुदाय घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चांगले जग निर्माण करण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्वांसह हातमिळवणी करून उपासना आणि सेवा केंद्रीत उपक्रम आणि कार्यक्रम यांच्या माध्यमातून ते नवीन संस्कृतीचा पाया घालण्यासाठी परिश्रम घेत आहेत. बहाई धर्मश्रध्देच्या अनुयायांसाठी, जी एक सर्वात नवीन जागतिक धर्मश्रध्दा आहे, हे प्रयत्न मोठ्या प्रमाणावरील जागतिक उपक्रमांचा भाग आहेत ज्यांचा सर्वस्वी हेतु मानवजातीचे आध्यात्मिक आणि भौतिक ऐक्य स्थापित करणे हा आहे.
भारतातील बहाई प्रत्येक कल्पनीय पार्श्वभूमीतून आलेले दिसतात--अंदमानच्या जंगलापासून ते मुंबईच्या उत्तुंग इमारतीतून, तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून ते सिक्किमच्या डोंगराळ प्रदेशातून. एकत्रित उपासनेसाठी, मुलांचे, किशोरवयीन आणि प्रौढांचे आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठीच्या वर्गांसाठी, त्यांची घरे उपलब्ध करून देऊन, एकता, न्याय आणि सर्वांचे कल्याण या तत्वांना अनुसरून समाजातील जीवनाचा साचा बांधण्यासाठी विविध ठिकाणी ते त्यांच्या स्थानिक रहिवाशांशी सहयोग करीत आहेत.
विशाल, प्राचीन आणि विविधतापूर्ण भारत जसजसा एकविसाव्या शतकाच्या प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे, त्यावेळी नवीन क्षितिजे उघडत आहेत. या भविष्यामुळे आलेल्या संधी आणि आव्हाने, या जटिल आणि एकमेकांशी जोडलेल्या जगात यशस्वी होण्यासाठी व्यक्ती, संस्था आणि समुदायांकडून, आध्यात्मिक परिपक्वतेची आणि बौद्धिक क्षमतेची नवीन पातळी अपेक्षित करत आहेत.
भारतातील बहाई समुदाय क्षमता निर्माण करण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेत गंभीरपणे वचनबद्ध आहे जी देशाच्या जनतेला न्याय व एकतेवर आधारित जग निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यात सुसज्ज करेल.
धर्माचे नूतणीकरण
संपूर्ण इतिहासात, परमेश्वर दैवी अवतारांच्या रूपाने मानवजातीस प्रकट झाला आहे. बहाउल्लाह हे सर्वात अलिकडील अवतार आहेत, ज्यांनी या आधुनिक जगासाठी आध्यात्मिक व सामाजिक शिकवणी प्रकट केल्या आहेत.पुढे वाचा...
समाज घडविण्याची प्रक्रिया
संपूर्ण भारतात, सर्व पार्श्वभूमीच्या व्यक्ती, विविध परिस्थितीत, आध्यात्मिक व भौतिकरीत्या समृद्ध अशा समाजाचा पाया घालत आहेत. ते उपासनेच्या आणि सेवेच्या अक्ष्याभोवती फिरणाऱ्या उपक्रमांद्वारे सार्वत्रिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहेत.
पुढे वाचा...
उपासना गृह
बहाई उपासना गृह सामुदायिक जीवनाच्या दोन आंतरसंबंधित घटकांना एकत्र आणते–उपासना व सेवा. प्रार्थना मंदीर धर्मांच्या एकतेचे व परमेश्वरी अवतारांच्या शिकवणी शेवटी एकाच वास्तवाची द्वारे आहेत या संकल्पनेचे प्रतीक आहे.
पुढे वाचा...