“मानवाची गुणवत्ता सेवा आणि सद्गुणामध्ये असते, धन व श्रीमंतीच्या थाटामाटामध्ये नव्हे…”



बहाउल्लाह

साऱ्या जगातील बहाई समाजाने सुरु केलेल्या विविध समाज घडविण्याच्या उपक्रमांचा गाभा म्हणजे उत्साही व भरभराटीचे समाजजीवन बनविण्यासाठी आवश्यक ती क्षमता तरुण व प्रौढ व्यक्तींमध्ये विकसित करण्यासाठी एक विकेंद्रित शिक्षण प्रक्रिया. ही शैक्षणिक प्रक्रिया ‘अध्ययन वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या गटांतून सादर होते. परमेश्वराच्या वचनांवर आधारित असलेल्या या अध्ययन वर्गांच्या विषयक्रमाचे उद्दिष्ट, सर्व पार्श्वभूमीच्या व्यक्तींची बौध्दिक, नैतिक, आध्यात्मिक आणि प्रात्यक्षिक क्षमता वाढविणे हे असते. त्यात विषयांची एक मालिका असते ज्यांचा हेतु समाजसेवेसाठी क्षमता वाढविणे हा असतो, उदाहरणार्थ बालकांच्या आध्यात्मिक शिक्षणासाठी वर्ग चालविणे, प्रार्थनासभा आयोजित करणे आणि अध्ययन वर्गांचे प्रशिक्षक होणे.

‘प्रशिक्षण संस्था’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेतील अभ्यासक्रमातून जे एकत्र जातात ते सर्व सेवेचे मार्गक्रमण करतात, अशी प्रक्रिया जी साचेबंद असली तरी लवचिक असते. ही प्रक्रिया असंख्य लोकांना परमेश्वराच्या वचनांवर आणि त्यांच्या जीवनावरील तसेच समाजावरील परिणामांवर सखोल चिंतन करण्यास व त्यांच्या समाजाच्या कल्याणासाठी शिकलेल्या गोष्टींचा एकत्रितपणे उपयोग करून घेण्यास समर्थ करते.